ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष…!

मोठ्या गटात जान्हवी परब, बाल गटात गार्गी मुणगेकर प्रथम
चिंदर सेवा संघ आयोजित कथाकथन स्पर्धा
ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर चिंदर सेवा संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज्यांची 395 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भगवंतगड शाळे पासून भगवंत गड किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिरात पर्यंत जय भवानी जय शिवाजीच्या गजरात आज शिवजयंती उत्सवाची सुरुवात झाली. सिद्धेश्वराची, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या माजी मुख्याध्यापिका सौ. हेमांगी खोत, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री तसेच चिंदर केंद्राचे माजी केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. हेमांगी खोत यांचा सरपंच स्वरा पालकर, प्रसाद चिंदरकर यांचा अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते तर राजेंद्र प्रसाद गाड यांचा खजिनदार गणेश गोगटे यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, इतर मान्यवर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीचे बुवा संदिप परब यांनी मावळ्यांन सह छत्रपती शिवराय यांचा जिवंत चल चित्र देखाव्या
सह सादर केलेल्या “एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर” या गाण्याने साक्षात शिवकाल अवतरीत केला त्याने शिवकालीन वातावरण तयार झाले.
यावेळी शिवकालीन ऐतिहासिक प्रसंगावर कथाकथन स्पर्धेत मोठ्या गटात चिंदर भगवंत गड शाळेच्या जान्हवी आनंद परब हिने प्रथम, आचरा हायस्कूलच्या विभावरी परेश चव्हाण हिने द्वितीय, किंजल आनंद परब हिने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ चिंदर नं १ च्या हर्ष कानविंदे व आचरा हायस्कूलच्या देवयानी पाटणकर यांनी प्राप्त केला त्यांना तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्स मुंबई गणेश अपराज यांच्यावतीने ७००, ५००, ३००, २०० रुपयाची शाळेय साहित्य भेट देण्यात आले. लहान गटात चिंदर कुंभारवाडी शाळेच्या गार्गी उमेश मुणगेकर हिने प्रथम, पालकरवाडी शाळेच्या मिहिर मिलिंद चिंदरकर याने व्दितीय क्रमांक, आचरा इंग्लिश स्कूलच्या भार्गव शंकर पालकर यांने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ भटवाडी शाळेच्या सुजल परेश चव्हाण यांनी प्राप्त केले त्यांना प्रथम पारितोषिक कै अनिल हडकर यांच्या स्मरणार्थ जयवंत हडकर यांच्या कडून ५००, तर चिंदर सेवा संघा कडून ३००, २००, १००, रुपयाचे शालेय साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी चिंदर सेवा संघाचे सिद्धेश गोलतकर, उपसरपंच दिपक सुर्वे, आशिष कोरगावकर, विवेक परब, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, शंकर पालकर, विनायक मसुरकर, भूषण दत्तदास, संतोष अपराज, रविंद्र गोसावी, सचिन तवटे, नंदकुमार जुंधळे, संजय जाधव, राठोड सर
,कैलास काळे, घोलप सर, महाले मॅडम, उज्वला पवार, भाग्यश्री फाटक, पूजा विभूते, स्मिता जोशी, निशिगंधा वझे, हर्षद बेनाडे, मंगेश नाटेकर, विश्राम माळगावकर, रोहित पाटील, शमिका पारकर, अजित नार्वेकर, अमृता तोरसोळकर शिक्षक, ग्रामस्थ, शिवप्रेमी, आदी उपस्थित होते.





