छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा सत्कार

मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आले आहेत विविध उपक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमा च्या दरम्यान कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी उपस्थिती लावली. या वेळी मराठा समाजातर्फे मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाई परब, महेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, सोनू सावंत, माजी नगरसेविका मेघा गांगण, माजी नगरसेविका मेघा सावंत, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, बच्चू प्रभूगावकर आदी उपस्थित होते.