राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले छत्रपतींना अभिवादन

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळा तर्फे सत्कार

शिवजयंती निमित्त पुतळा परिसरात करण्यात आली आहे आकर्षक सजावट

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी शिवजयंती निमित्त अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या कणकवली शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ यांचे आनंद पारकर, कल्याण पारकर, राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,पत्रकार रमेश जोगळे,आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळातर्फे अबिद नाईक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!