शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पटवर्धन चौकात शिवजयंती साजरी

शहरातील विविध ठिकाणच्या शिवजयंतीला भेटी देत छत्रपतींना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिवादन
मराठा समाजाच्या उपक्रमांना भेट देत दिल्या शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज कणकवली ठाकरे गटाच्या वतीने पटवर्धन चौक येथे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वतीने शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत संदेश पारकर युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदींनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच या शिवजयंती उत्सवाला मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ही भेट देत अभिवादन केले. यासोबत कणकवली मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवजयंती उत्सवाला संदेश पारकर व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. तसेच कणकवली छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील छत्रपतींच्या पुष्पहार अर्पण करत संदेश पारकर सुशांत नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपतींना अभिवादन केले. या यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, रुपेश आंबडोस्कर, विभाग प्रमुख किरण वर्दम, गुरुनाथ पेडणेकर, तेजस राणे, महेश कोदे, मराठा समाजाचे महेश सावंत,बच्चू प्रभूगावकर, उमेश वाळके, दिवाकर मुरकर, औदुंबर राणे, बबलू सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये ,विलास गुडेकर, राजू राणे, शेखर राणे आदि उपस्थित होते. त्यावेळी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत परिसर दुमदुमून गेला.