समता स्वयं सहाय्यता महिला समूह,शेर्पे यांची bkc मुंबई येथील महालक्ष्मी सरससाठी निवड

“अन्नपूर्णा केटरर्स महिला गृहउद्योग ” या नावाने प्रसिद्ध आहे हा समूह
समता स्वयं सहाय्यता महिला समूह या समूहाची महालक्ष्मी सरससाठी bkc मुंबई निवड करण्यात आली आहे.हा समूह “अन्नपूर्णा केटरर्स महिला गृहउद्योग ” या नावाने प्रसिद्ध आहे.या समूहातील सर्व महिला मेहनती व कष्टाळू आहेत.त्याच सोबत समूहाची शेती करतात.कुळीथ पीक,भाजीपाला ,भातशेती ही पिके घेतात.१२ डिसेंबर ते २५ डिसेंबर झालेल्या वाशी येतील महालक्ष्मी सरस साठी हि त्यांची निवड झाली होती.आणि पुन्हा एकदा त्यांची निवड महालक्ष्मी सरस बांद्रा मुंबई येथे शासन तर्फे निवड करण्यात आली आहे.या सरस साठी निशा गुरव,सायली पांचाळ ,समीक्षा शेलार,सरिता शेलार ,सिद्धी शेलार,वैभवी शेलार ,समीक्षा कुलकर्णी व दक्षता शेलार यांनी सहभाग घेतला.आम्हाला शासनाने एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.असे मत व्यक्त करण्यात आले.आम्हाला जिल्हा समन्वयक,तालुका सम्वयक,प्रभाग समन्वयक यांनी सहकार्य लाभले.असेही या समूहातील महिलांनी सांगितले.