सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा राजीनामा.

सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. संजय पडते यांच्या राजीनामा हा ठाकरे सेनेला धक्का मानला जातोय. त्यांनी पुढील निर्णय लवकरच घेऊ असं जाहीर केला आहे.. अलीकडेच कुडाळमध्ये नगरसेवकांनीही राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा महत्त्वाचा आणि ठाकरे सेनेला धक्का देणारा मानला जातो..