जिल्हास्तरीय बाल कला क्रीडा स्पर्धेत पिरावाडी शाळेचे यश

ऐश्वर्या तोडणकर उंच उडीत जिल्ह्यात प्रथम
जिल्हास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव नुकताच ओरस येतील डॉन बॉस्को मैदानावर संपन्न झाला. आचरा येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोंयंडे शाळा पिरावाडी शाळेने रनिंग, उंच उडी, रिलेव खो-खो या क्रीडा प्रकारात पंधरा मुलांनी सहभाग दर्शवला होता. या सर्व मुलांची तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर निवड झाली होती यामध्ये ऐश्वर्या महेश तोडणकर हिने उंच उडी या प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद तळवळकरउपाध्यक्ष पूर्वा तारी,मुख्याध्यापक सुभाष नाटेकर,माजी सरपंच डॉ प्रमोद कोळंबकर यांनी अभिनंदन केले आहे.