संजय पवार यांचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्काराने सन्मान

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे जिल्हा संचालक तसेच खारेपाटण व कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख व कणकवली प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पवार सर यांचा नुकताच केंद्रातील शिक्षकाच्या वतीने आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचा कार्यक्रम नुकताच जि.प.शाळा शिडवणे नं.१ येथे संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्ती केंद्रप्रमुख श्री संजय पवार यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन शिक्षकांच्या वतीने केंद्रातील उत्तम कामगिरी बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी खारेपाटण जि.प.केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा देखील खान अकॅडमी मध्ये शाळेने उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल केंद्रातील शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रातील शिक्षकांनी एकत्र येऊन एका केंद्रप्रमुखाचा आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार देऊन गौरव करणे किंवा सत्कार करणे ही गोष्ट फार दुर्मिळच … परंतु केंद्र प्रमुख श्री संजय पवार सर यांचे उत्तम प्रशासकीय कामकाज,प्रशासन व शिक्षक यांच्यातील समन्वय,उत्तम तंत्रज्ञानाची माहिती व सखोल शैक्षणिक धोरणांचा अचूक अभ्यास यामुळे ते जिल्ह्यातील एक हुशार केंद्रप्रमुख म्हणून ओळखले जातात. यावेळी केद्रस्तरिय शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!