कुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत चा स्तुत्य उपक्रम

कुरंगवणे बेर्ले मधील सर्व शाळांमध्ये बसविण्यात आले सिसिटीव्ही

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत मार्फत नुकताच अभिनंदनीय असा उपक्रम संपन्न झाला. आपल्या गावच्या मुलांच्या शैक्षणिक उन्नती साठी तसेच मुलाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळेत सिसिस्टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगाच्या आराखड्यातुन या निधीची तरतूद करण्यात आली असून. ग्रामपंचायत च्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थी,ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. नुकतेच हे सिसिटीव्ही कॅमेरे कुरंगवणे बेर्ले मध्ये असणाऱ्या कुरंगवणे पश्चिम शाळा, कुरंगवणे खैराट शाळा, बेर्ले शाळा या शाळेत बसविण्यात आले.यावेळी सरपंच -पप्पु ब्रम्हदंडे
,उपसरपंच- बबलु पवार,सदस्य बाबल्या गोसावी,अक्षदा सादिकले,स्नेहा गोसावी,विशाखा राऊत,रविंद्र पवार,सारीका कुडाळकर आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!