शिक्षक भारती आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कणकवली संघ विजयाचा मानकरी!
देवगडला उपविजेतेपद
वांयगणी येथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व शिक्षक भारती मालवण यांच्यावतीने मालवण तालुक्यातील वायंगणी हायस्कूलच्या मागील पटांगणात आयोजित शिक्षकांच्या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेत शिक्षक भारती कणकवलीच्या संघाने विजेतेपद पटकावले असून शिक्षक भारती देवगड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
‘एक उनाड दिवस शिक्षकांसाठी’ या ब्रिद वाक्य घेऊन दैनंदिन कामकाजातून आणि गतीमान जीवनातून निखळ आनंद मिळवण्यासाठी शिक्षक भारती राज्य प्रमुख कार्यवाह तथा माजी जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर आणि जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर यांच्या नेतृत्वाखाली 7 तालुक्यातील सुमारे २००पेक्षा अधिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 16 संघासह जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य या स्पर्धेत उतरलेल्या होते.
उपांत्य फेरीत सावंतवाडी सघांचा कणकवली शिक्षक भारती संघाने तर देवगड शिक्षक भारती संघाने मालवण शिक्षक भारती संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.अतिशय खेळीमेळीत अंतिम सामना कणकवली आणि देवगड संघात झाला. देवगड तालुक्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली पण , कणकवली तालुकाच्या नियोजनबद्ध रणनितीमुळे व श्री.घुंगरट,श्री गांगुर्डे यांच्या भक्कम फलंदाजी आणि गोलंदाजीसमोर तसेच संपूर्ण संघाच्या चपळ क्षेत्ररक्षणासमोर देवगड तालुक्याला विजेत्या पदापर्यंत पोहचता आले नाही. कणकवली तालुक्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिलेले टार्गेट सहज पुर्ण केले आणि शिक्षक भारतीच्या मानाच्या ‘विजेता चषकावर ‘ आपले नाव कोरले. विजेत्या कणकवली तालुका शिक्षक भारती संघात प्रसाद मसुरकर ,दत्तात्रय मारकड,जनार्दन शेळके,बयाजी बुराण, सुमंत दळवी ,संदीप कदम,सत्यवान कदम,गौरव घुंगरट ,श्री.गांगुर्डे,अंबादास जोफळे,देवेंद्र देवरुखकर,आनंद सुतार
संदीप पेंडूरकर आदी शिक्षक-शिक्षकेत्तर खेळाडूंचा समावेश होता.तर उपविजेतेपद पटकाविलेल्या देवगड शिक्षक भारती संघात सत्यपाल लाडगावकर,आकाश पारकर,रुपेश बांदेकर,सागर फाळके, महेश जाधव, विशाल पारकर ,सचिन मोरे इमरान नवाब, सुरेश पवार, अजित कविटकर,गणेश ढेकळे आदी शिक्षक -शिक्षकेतर खेळाडूंचा समावेश होता.
विजेत्या व उपविजेतेपद सघांना तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री घुंगट (कणकवली) उत्कृष्ट गोलंदाज राजेश आजगावकर (सावंतवाडी) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कपिल परब (मालवण), जेष्ठउत्कृष्ट खेळाडू संजय वेतुरेकर व सत्यपाल लाडगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर
शिक्षक भारती राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर सचिव समीर परब, कार्यध्यक्ष प्रदीप सावंत,संघटक आकाश पारकर,माजी सचिव सुरेश चौकेकर, महिला आघाडीच्या अनिता सडवेलकर, वायंगणीचे सरपंच, शिक्षक भारतीचे महेंद्र वारंग,शाम वारंग,संजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व यशस्वीतांचे आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संजय वेतुरेकर यांनी सर्व संघाचे अभिनंदन करून निखळ आनंद मिळवण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्याचे सांगून विजेत्या कणकवली संघाचे तसेच उपविजेत्या देवगड संघाचे अभिनंदन करताना मालवण तालुक्याच्या अतिशय नेटक्या आयोजन व नियोजनाबद्दल विशेष कौतुक केले.या स्पर्धेला पंच म्हणून वायंगणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मालवण तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच प्रत्येक शिलेदादांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.