साळिस्ते नं.1 शाळेची विद्यार्थिनी स्वरा चिके बेंगलोर येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार 2024- 25 उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गने राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे.या अभ्यास दौऱ्यासाठी बेंगलोर येथे शाळा साळिस्ते नं.1 या शाळेची विद्यार्थिनी स्वरा रवींद्र चिके दिनांक 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत बेंगलोर येथे सहलीसाठी रवाना झाली आहे.ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत आहे. अशा शाळांची निवड झाली आहे .व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, मुख्याध्यापक सत्यवान घाडीगांवकर ,वर्गशिक्षक शिक्षक सिताराम पारधिये ,पदवीधर शिक्षिका संजना ठाकूर , उपशिक्षक संगीता वळवी, व माधवी बुचडे मॅडम तसेच पालक ग्रामस्थ या सर्वांनी स्वराचे भरभरून कौतुक केले.