घरगोती सजावट स्पर्धेत विनोद महाडिक तर रील स्पर्धेत सचिन वाघेश्री प्रथम

भालचंद महाराज यांच्या जयंतीनिमित्त नमो भालचंद्र ग्रुपचे आयोजन

भालचंद्र महाराज संस्थान येथे पारितोषिक वितरण

भालचंद्र महाराज यांच्या 121 व्या जन्मोत्सव निमित्त नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने घरगोती सजावट व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक विनोद महाडिक तर रील स्पर्धेत सचिन वाघेश्री( एस डब्ल्यू एडिटेड) हे विजेते मानकरी ठरले. उपस्थित विजेत्यांना भालचंद्र महाराज संस्थान येथे मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भालचंद्र महाराज यांच्या जयंतीनिमित्त ओम नमो भालचंद्र ग्रुपच्या वतीने घरगुती सजावट व रिली स्पर्धा घेण्यात आली. घरगुती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भालचंद्र महाराज संस्थान येथे जयंती दिवशीच दैनंदिन आरती झाल्यावर पार पडला. तर रील स्पर्धेचा निकाल गुरुवारी संस्थान येथे रात्रौ दैनंदिन आरती नंतर जाहीर करण्यात आला.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, संस्थांनचे सभासद अण्णा कोदे,उमेश वाळके,राजन पारकर, महेंद्र अंधारी,भैय्या आळवे,प्रसन्ना देसाई, संतोष पुजारे,रमेश काळसेकर,सर्वेश शिरसाठ, सोहम वाळके, चेतन ताम्हणकर, प्रद्युम मुंज तर रील स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना सुधीर कामत, राजन पेडणेकर, विलास बिडये, नाना कोदे, बंडू पारकर, अनिल हर्णे, हर्षा कर्पे, हे सौ.सापळे, श्रीमती नार्वेकर, अमोल बोभाटे यांच्यासह स्पर्धक व भावीक भक्त आदी उपस्थित होते.
घरगुती सजावट स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, द्वितीय क्र.तृप्ती म्हाडगुत, तृतीय क्र.मनोज कोदे, चौथा क्र.अमोल शंकरदास, पाचवा क्र.डॉ.विठ्ठल गाड, उत्तेजनार्थ प्रथम क्र.वैशाली काणेकर, उत्तेजनार्थ द्वितीय क्र.हार्दिक वाळके, उत्तेजनार्थ तृतीय क्र.दुर्वेश सापळे यांना तर रिली स्पर्धेतील द्वितीय क्र.समीर तावडे तृतीय क्र.रोहित कडू यांना मिळाला.
या स्पर्धेनिमित्त बोलताना सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे म्हणाले, सजावट हे उद्दिष्ट नसून यामधून समाज प्रबोधन व्हावे. एक कणकवलीचा सांस्कृतिक भाग यातून दिसावा. तसेच या निमित्ताने शहरामध्ये भक्तिमय वातावरण निर्मिती व्हावी. या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात येते. या स्पर्धेला कोणी कितीही विरोध केला तरी यापुढेही ही स्पर्धा अशीच नागरिकांच्या उदंड प्रतिसादा सोबतच आश्रयदात्यांच्या जोरावर घेतली जाईल. आपले सहकार्य आणि संस्थांनच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी करू.असे आश्वासन त्यांनी दिले.
घरगुती सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून हनुमंत तांबट व प्रथमेश गावकर यांनी काम पाहिले तर विल्स स्पर्धेचे परीक्षण शिरवलकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळू वालावलकर यांनी मानले. यापुढेही स्पर्धकांच्या उदंड प्रतिसादा सोबत अशाच स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!