शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची ती बैठक चिपि विमानतळा संदर्भात नव्हती

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली, संदेश पारकर, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना मध्ये उपस्थित होते. यादरम्यान ते या दालना मधून बाहेर पडत असतानाच चिपी विमानतळाच्या संदर्भातील आय आर बी कंपनीचे संचालक किरणकुमार, व्यवस्थापक कुलदीप सिंग, टर्मिनल व्यवस्थापक श्री राव हे या शिष्टमंडळाच्या नजरेस पडले. त्यामुळे सदर शिष्टमंडळाने सदर अधिकाऱ्यांसोबत पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी झालेली बैठक ही चीपि विमानतळा संदर्भात नियोजित बैठक नव्हती अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी विमानतळा संदर्भात किरणकुमार यांनी एक विषय मांडला व चर्चा करून संबंधितांची बैठक घेऊ असा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!