मा वि नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे संपन्न झाले.

कणकवली/मयूर ठाकूर

माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले.
यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साशृनयनाणी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि ५ व ६ जानेवारी रोजी ३५ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला २५ बंधुभगिणी एकत्र आल्या होत्या.यावेळी नाशिक, पुणा, मुंबई व नाटळ पंचक्रोशीतील सर्व मित्र,मैत्रिणी सहभागी होत खुप मौज,मस्ती केली. बालपणीचे खेळ क्रिकेट, विटीदांडू अलिबाग बिचवरील कबड्डी खेळत धमाल ऊडवून दिली.अलिबाग येथील विषेश खाद्य पदार्थ पोपटीने तर वेगळी ओळख करून दिली. यावेळी प्रत्येकाला मी कसा घडलो याविषयावर चर्चा करत असताना रात्रीचे ११ केव्हा वाजले हे समजल नाही सर्व जण प्रत्येकाच्या जीवनप्रवासात डुंबून गेले होते. व्ही. टी. गेटवेऑफ इंडिया ते अलिबाग बोटीवरील जाणे येणे प्रवास अवर्णनीय होता .
सर्वांनी शाळेतील शिक्षकांच्या आणि त्यांनी घेतलेले कष्ट आणि प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपापल्या जीवनातील संघर्ष आणि यशस्वी होण्यासाठी लागणार्‍या गुणांचा उहापोह केला. मार्गदर्शन तसेच मदत करणार्‍या व्यक्तींबद्दल सुद्धा कृतज्ञता दर्शविली.नव्याने भेटण्यासाठी आणि एकमेकांना मदत करण्याची, तसेच अजून काही उपक्रम राबवण्याचे संकल्प करत कार्यक्रमाची सांगता केली.
यात माझी विद्यार्थिनीचा सक्रिय सहभाग आणि संख्या लक्षणीय होती. मैत्रिणींनी एकमेकांना सुख दुःखात मदत करत मैत्रीचा वस्तुपाठच दाखवुन दिला. एकूणच फक्त मौज मस्ती एवढंच उद्देश्य न ठेवता आपल्या समाजाला खारीचा वाटा उचलत काय देता येईल, या कडे वाटचाल सुरू झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशी खात्री वाटते. या वेळी उपस्थित प्रथितयश उद्योजक, शिक्षक आणि शेतकरी यांच्या यशोगाथा ऐकुन तसेच जीवनात उतार वयातील शिक्षणातील यशाने आणि निरंतर प्रशिक्षण आणि स्वतःला अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी झगडणारी, नवीन युगात यशस्वी होण्यासाठी लागणार्‍या उर्मी अंगीकृत केल्याचे पाहून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
गेट टुगेदर आयोजित करण्यासाठी विशेषतः भारती गुरव हिने विशेष मेहनत घेतली. गिरीश सर्वांना तृप्त करुन मगच जेवण करायचा यामध्ये त्याचा सामाजिक गुण दिसून आला. विशेष: भगिनी कुटुंब वत्सल असतानासुद्धा आपली सर्व सुखदुःख बाजूला ठेवून सहभागी झाल्याबद्दल त्यांना सर्वांनी धन्यवाद दिले. सर्वांनीच गेट टुगेदर यशस्वी होण्यास मेहनत घेऊन व बहुमूल्य वेळ देऊन ऊपक्रम यशस्वी केला .यावेळी पु.ल.देशपांडे यांच्या बालपणीचा काळ सुखाचा या पाठाची आठवण होत होती एकंदर हा दौरा अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
फोटो ओळी : माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे संपन्न झाले या वेळी जमलेले सर्व माझी विद्यार्थी, विद्यार्थिनी.

error: Content is protected !!