कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

उद्योजक पुरस्कार हनुमंत सावंत यांना तर राजन कदम, मिलिंद पारकर, अस्मिता गिडाळे यांना पत्रकार पुरस्कार

कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार राजन कदम ( संपादक- साप्ताहिक सिंधुदुर्ग टूडे ), ज्येष्ठ पत्रकार शशी तायशेट्ये उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिलिंद पारकर ( उपसंपादक दै.प्रहार), अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार अस्मिता गिडाळे (वार्ताहर दै.पुढारी – खारेपाटण) तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार संजोग सावंत (कनेडी) यांना जाहीर करण्यात आले आहेत. तर यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी कळसुलीचे सुपूत्र हनुमंत सावंत यांची, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी हरकुळ खुर्द येथील तानाजी रासम यांची आणि पत्रकार सन्मान पुरस्कारासाठी संजय पेटकर ( दै.तरूण भारत ) यांची निवड करण्यात आली आहे.
कणकवली तालुका पत्रकार संघाची बैठक सोमवारी येथील भवानी हॉलमध्ये झाली. या बैठकीत एकमताने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या बैठकीला कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, कार्यकारणी सदस्य भास्कर रासम, ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे, जिल्हापत्रकार संघ कार्यकारणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भगवान लोके, चंद्रशेखर देसाई, पत्रकार सुधीर राणे, नितीन कदम, विरेंद्र चिंदरकर, सचिन राणे, गुरूप्रसाद सावंत, नंदु कोरगावकर, दिलीप हिंदळेकर, नितीन तळेकर, दर्शन सावंत, शशिकांत सातवसे, संजय पेटकर, हेमंत वारंग, मयुर ठाकूर, तुळशीदास कुडतरकर, अस्मिता गिडाळे, विराज गोसावी आदी उपस्थित होते.
फेब्रुवारी महिन्यात सन्मानपुर्वक या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पुरस्कार प्राप्त पत्रकार व अन्य पुरस्कार विजेत्यांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!