नागवे गावच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही!

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांचे प्रतिपादन
नागवे गावांमधील अनेक विकास कामांची गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन
नागवे गावातील क्रिकेट स्पर्धेचे देखील केले उद्घाटन
नागवे ग्रामपंचायतच्या निवडणूकीलां दोन वर्ष झाली व नव्याने सरपंच व सदस्य भाजप पक्षाच्या विचाराने निवडून आले.आणि विकासास प्राधान्य देवून खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नागवे गाव हा विकासाकडे जात आहे .सध्या नागवे गावाचे पालकत्व संदेश (गोट्या) सावंत व संजना सावंत यांनी स्वीकारले आहे. नागवे गावात जातीनिशी लक्ष घालून गावात कुठेपण निधी कमी पडता कामा नये याकडे लक्ष दिल्याने गेल्या वर्षभरात कामास वेगाने सुरुवात झाली. सातत्याने प्रशासकिय अधिकारी/ अभियंता / लोकप्रतिनीधी यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला.आवश्यक असणा-या कागदपत्राची वेळीच पूर्तता केली त्यामुळे विकास कामांना गती मिळाली.त्यात
1) नागवे ढवणवाडी ते आईनमळावाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .
2)नागवे तवटेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे
3)नागवे गाव नवीन सुसज्ज व्यायामशाळा बांधकाम करणे
या विकास कामाचा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला यावेळी मंगेश सावंत,कार्याध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच संदेश उर्फ मन्या सावंत ग्रा.पं.सदस्य यांच्या संपर्क व पाठपुरावा होता.
याभूमीपूजनाचा प्रसंगी सरपंच सिध्दिका जाधव,उपसरपंच महेंद्र कुडाळकर,तसेच भाजपा कार्यकर्ते, श्री.काका सातवसे श्री. स्वप्नील पाताडे,सुरेंद्र भोसले.विजय (बाळा)सावंत राजू पाटकर ,श्री.नारायण आर्डेकर बाळू तवटे प्रभाकर तेली तात्या ढवण आप्पा कदम ,सचिन खेडेकर,सिद्धार्थ जाधव इत्यादी तसेच ढवणवाडी आईनमळा तसेच तवटेवाडी आणि गावातील इतर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.