राजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड
कुडाळ : वेंगुर्ला येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या ठिकाणी कुडाळ येथील हॉटेल व्यावसाईक राजन सुरेश नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचालित पर्यटन समीतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे सचीव नितीन वाळके व सदस्य नंदन वेंगुर्लेकर यांनी ही घोषणा केली. राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या राज्य पर्यटन समितीवर यापूर्वीच निवड झालेली आहे. तसेच ते सिंधुदुर्ग हॉटेल मालक उन्नती संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
हि पर्यटन समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढीबरोबरच शासन स्थरावरुन अधिकाधिक सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी पर्यटनाबरोबरच साहसी क्रीडा पर्यटन, गडकिल्ले सवर्धन, याचबरोबर प्रकाशझोतात नसलेली अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांसमोर आणणार आहेत. या पर्यटन समीतीमध्ये उपाध्यक्ष पदावर जगदीश मांजरेकर- सावंतवाडी, प्रमोद नलावडे- देवगड, प्रसाद गावडे (रानमाणूस), सचिव पदावर विलास कोरगांवकर- कणकवली, सदस्य म्हणून गजानन कांदळगावकर- कुडाळ, चेतन परशुराम गंगावणे- कुडाळ, मोहनीश कुडाळकर- कुडाळ, तेजस साळूंखे- वैभववाडी, संजना काकडे- कणकवली, सुशील पारकर- कणकवली, राजू जठार- तरळे, महेश गुरव- वैभववाडी, नरेंद्र कोलते, उदय सावंत, मिलींद कुबल, अजित टाककर – देवगड, दिग्विजय कोळंबकर- देवगड, संदेश गोसावी- सावंतवाडी, सर्वेश गोवेकर- सावंतवाडी, दीपक कर्पे- सावंतवाडी, राजू भालेकर- सावंतवाडी, विवेक खानोलकर- वेंगुर्ला, राजेश नाईक- वेळागर, सिलेस्तीन फर्नांडीस- उभादांडा, महेश सामंत- भोगवे, लवू मिरकर- दोडामार्ग, संतोष नानचे – दोडामार्ग, दिलीप आसोलकर- दोडामार्ग, मोहन गावडे- दोडामार्ग, आनंद कामत- दोडामार्ग, त्याचप्रमाणे जिल्हासमन्वयक म्हणून नंदन वेंगुर्लेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. अजूनही काही पदाधिकारी यांची नेमणूक येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यापैकी देवगड तालूका पर्यटन समिती सहा महिन्यापूर्वी गठीत झालेली असून उर्वरित सातही तालूक्यात येत्या महीन्यात तालूका पर्यटन समिती गठीत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे एम टी डी सी व जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्या व्यापारी महासंघ संचलीत जिल्हा पर्यटन समिती नजीकच्या काळात जिल्हास्तरीय पर्यटन परिषद घेणार आहे.
ही जिल्हा पर्यटन समिती, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण पर्यटन आराखडा तयार करून महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री नामदार मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेवून जिल्ह्याचा पर्यटन आराखडा सादर करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी सांगीतले आहे.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ