यंगस्टार मित्रमंडळ आयोजित कणकवलीत भव्य कबड्डी स्पर्धा

खेळाडू सह क्रीडा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

कणकवली : यंगस्टार मित्र मंडळ कणकवली आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कणकवली येथे कणकवली कॉलेजच्या पटांगणावर दिनांक 10 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी व 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत निमंत्रित सोळा संघांचा सहभाग असणार आहे. तरी क्रीडा रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यंग स्टार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25 हजार 27 तर द्वितीय पारितोषिक 25 हजार 27 व प्रत्येकाला यंगस्टार चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!