महिन्याभरात पुन्हा आरबी केक शॉप, कॅफे ला आग लागुन नुकसान

आगीत ओव्हन व अन्य साहित्य जळून भस्मसात
रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराची घटना
निष्काळजीपणामुळे आगीच्या दुर्घटना टाळण्याचे
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन
कणकवली शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी केक शॉप व कॅफे ला आज रविवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या कॅफेमधील ओव्हन व अन्य इलेक्ट्रिक साहित्य हे बाहेर असल्याने चालत जाणाऱ्या काही नागरिकांना आग दिसली. व त्यांनी याबाबत या कॅफेच्याच मागील बाजूस घर असलेल्या राजू गवाणकर यांना या आगीची कल्पना दिली. त्यानंतर श्री गवाणकर यांनी आग विझवण्यासाठी असलेल्या छोट्या अग्निशमक सिलेंडर च्या साह्याने ही आग आटोक्यात आणली. महिन्याभरात पूर्वी आरबी बेकरी अशीच आग लागून भस्मसात झाली होती. त्यानंतर त्याच मालकाचा दुसरा कॅफे व केक शॉप ला आग लागल्याने यात कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री तातडीने कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. व नगरपंचायत चा अग्निशमन बंब देखील बोलावण्यात आला. मात्र सुदैवाने आग लागल्यावर लगेचच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. कणकवली पटवर्धन चौकात असलेल्या आरबी केक शॉप व कॅफे च्या बाहेरील बाजूस ओव्हन व अन्य इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्यात आलेले होते. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ओव्हन सुरूच असल्याने आगीने पेट घेतला. त्यामुळे यात मोठा ओव्हन व अन्य आसपासचे इलेक्ट्रिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. तसेच त्या बाजूला असलेल्या बेकरी मधील बाहेर ठेवलेल्या काही वस्तू देखील जळाल्या. दरम्यान ही बाब तिथून चालत जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आली त्यानंतर राजू गवाणकर यांनी तातडीने याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना घटनेची माहिती दिली. समीर नलावडे हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला देखील पाचारण केले. त्यानंतर तातडीने येथील उर्वरित साहित्य बाजूला करण्यात आले. यावेळी साहिल शंकरदास, ओम सुतार, राज नलावडे, गौरव गवाणकर, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. ओव्हन व अन्य इलेक्ट्रिक साहित्य सुरू ठेवल्याने आग लागल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. घटना घडतात तातडीने कॅफेचे शटर कामगारांना बोलावून उघडण्यात आले. मात्र सुदैवाने असतील भागात खात्री केली असता आगीची झळ पोचली नव्हती. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आर बी बेकरी ला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान महिन्यापूर्वीच झाले होते. त्यानंतर त्याच मालकाच्या या दुकानाबाबत ही दुसरी घटना घडली. मात्र या घटनेमध्ये ओव्हन व अन्य साहित्य सुरू ठेवलेले असल्याने हा प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा निष्काळजीपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मालकांनी देखील लक्ष ठेवावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यानिमित्ताने केले आहे. तसेच अनावश्यक वेळी इलेक्ट्रिक साहित्य सुरू न ठेवता किंवा रात्रीच्या वेळी घरात किंवा दुकानांमध्ये लावलेला दिवा सुरू न ठेवता त्याची खबरदारी कशी घेणे आवश्यक आहे असे श्री नलावडे यांनी सांगितले. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊन नुकसान टाळा असे आवाहन श्री नलावडे यांनी या निमित्ताने केले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली