नॅशनल अबॅकस स्पर्धेत कणकवलीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

३० नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापूर शहरात पार पडलेल्या प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटीशन मध्ये कणकवलीच्या एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेच्या युगात कमीतकमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत असते.
अबॅकस या स्पर्धेत शाश्वत तांबे (तिसरा), तनया पवार (चौथा), रूचा सावंत (पाचवा) क्रमांक पटकावून ट्राॅफीचे मानकरी ठरले तसेच तस्मय दळवी, भाग्यश्री पवार, ध्रुव कुवळेकर, अंश राठोड, जय खरात, श्रीनित राजूरकर, जय कोकरे, जागृती खरात, भागयेश सावंत, विवान पाटील, सांची जाधव, अनुश्री पुजारी, नारायण रणशूर, रिद्धी रजपूत, गौरांग राऊत, दुर्वांक राणे, आयुषी पुजारी, निमिष पवार, खुशी तावडे, यश गोसावी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
त्याचबरोबर वेदिक मॅथ्स या स्पर्धेत अनय सावंत, नंदिनी राणे,कृतिका सावंत यांचा प्रथम क्रमांक, श्लोक मांगे, अभा हजारे, प्रवीण खानविलकर, खुशी तावडे, रिद्धी रजपूत, दुर्वा तावडे यांचा द्वितीय क्रमांक, इशा चिंदरकर, गार्गी तांबे, नारायण रणशूर, स्विझल डिसोझा, भूमी कांबळी यांचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांना ट्राॅफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स क्लासला बेस्ट अबॅकस सेंटर हा विशेष पुरस्कार मिळाला. विद्यार्थ्यांना एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स सेंटरच्या संस्थापिका सौ.पूजा राणे मॅडम तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!