ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “सानेगुरुजी यांचे जीवनकार्य व योगदान यावर मार्गदर्शन.

कणकवली/मयूर ठाकूर.
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे प्रशालेत सानेगुरुजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोकण यात्रेच्या निमित्ताने सानेगुरुजींचे विचार मुलांसमोर पोहोचवण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी या कोकण यात्रेच्या प्रमुख वक्त्या माधुरी पाटील मॅडम, सातपुते मॅडम यांचा स्कूलच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .
सातपुते मॅडम यांनी सानेगुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई
पुस्तकामागची कथा सांगितली ,तसेच साने गुरुजींचे स्वातंत्र चळवळीतील योगदान त्यांनी स्पष्ट केले ,त्यानंतर माधुरी पाटील मॅडम यांनी साने गुरुजींनी सामाजिक रूढी परंपरा , अस्पृश्यता निर्मूलनासाठी, केलेले प्रयत्न यावर प्रकाशझोत टाकत सानेगुरुजी स्मारकाच्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली जी मुलांना प्रेरक ठरेल.
संस्था उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर यांनी या उपक्रमाची उपयुक्तता पटवून दिली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरून मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष बुलंद पटेल,मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम,तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पाटकर यांनी केले.