विषारी दारू विक्री प्रकरणी कारवाई करा अन्यथा आत्मदहन करणार!

कणकवली चे माजी सभापती सुरेश सावंत यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विषारी दारूचे प्रमाण वाढल्याने याची राजरोष पणे त्या दारूची विक्री होत असुन दिवसा ढवळ्या किराणा मालाच्या दुकाना सारखी दारूची दुकान चालु आहेत. त्या दारूमुळे गेल्या पाच वर्षात प्रत्येक गावात १० ते १५ तरुण मयत झालेले आहेत. तसेच १० ते १५ तरुण आजारी झालेले आहेत. विषारी दारूमुळे जे मयत झाले तत्यांना प्रत्येकी दहा लाख आणि जे विषारी दारु पिऊन आजारी आहे अशांना प्रत्येकी पाच लाख रुपये सर्वे करून देण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा कणकवली तालुक्याचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी दिला आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक गावामध्ये विषारी दारूने गेल्या पाच वर्षात किती जणांचा मृत्यू झाला? त्यांचे वय काय होते? ती दारू कुठे मिळत होती? ती दारू विकण्यासाठी कोण सहकार्य करत होते? ती दारू सिंधुदुर्गात तयार होते की अन्य राज्यातून महाराष्ट्रात आली, ती कशी आली? विषारी दारू पिऊन मेलेल्याच्या कुटुंबातील आज काय परिस्थीती आहे? येवढे तरुण दारू पिऊन मरे पर्यंत प्रशासन का गप्प होते? तरी या गोष्टीची खातेनिहाय चौकशी करून कारवाही व्हावी कारण प्रशासन म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय अश्या परिस्थितीत आहे. यापूर्वी प्रशासनातील अधिकारी प्रत्येक गावामध्ये वर्दी न देता भेटी देत असत परंतु आता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, मुख्यकार्यकारी अधिकारी कोण आहेत एसपी कोण आहेत हे जर शाळेतील मुलांना विचारलं तर त्यांना त्याची माहिती नाही ते अस सांगतात. ऑनलाईन व्यवहार झाले असल्या कारणाने कोणाचा कोणाला ठान पत्ता नाही असे यावरुन दिसुन येत आहे. आरोग्य खात्याची तर येवढी बिकट अवस्था आहे सर्व कामे आशा सेविका अंगणवाडी सेविका अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत. ज्यांचा पगार हजारोंनी रुपये आहे असे कर्मचारी गावामध्ये कुठेही फिरताना दिसत नाहीत. यापूर्वी घरभेटीचा कार्यक्रम असायचा प्रत्येक खात्यातील कर्मचारी घरभेट देऊन घरातील लोकांची चौकशी करायचे परंतु आता ते बंद झालेले आहे. काही काही कर्मचारी १५ ऑगस्ट,२६ जानेवारी रोजी ऑनलाईन झेंडा वंदन करतात सध्या वर्क फ्रॉम होम चालु आहे की काय अशी चर्चा जनतेत चालु आहे. विषारी दारु विक्री मध्ये स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचा हात आहे तसेच विक्री मध्ये पार्टनर आहेत असे जनतेत बोलले जाते. काही कर्मचारी ओरोस हेडकॉटर मध्ये असल्यामुळे दारु विक्रेत्यांचा त्यांना अभय आहे असही बोलल जात आहे. काही दारु विक्रेत्याकडून तक्रारदाराना ठार मारण्याची धमकी देत आहे. तरी प्रशासनाने साप हातचा निसटल्या नंतर पुंगी वाजवुन काही उपयोग होणार नाही हे लक्षात ठेवावं. तरी येणाऱ्या पंधरा दिवसात विषारी दारू विक्री बंद न झाल्यास तसेच दारू पिऊन मयत झालेल्यांना तसेच आजारी असलेल्यांना मदत न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर गमिनिकाव्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतुन आत्मदहन करणार याची नोंद घ्यावी याची सर्वोसवी आपण जबाबदार असाल असा देखील इशारा सुरेश सावंत यांनी दिला आहे.

error: Content is protected !!