शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

महायुतीला जिल्ह्यासह राज्यात प्रचंड मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.तालुका सरचिटणीसपदी अमर राणे, सहसचिवपदी आनंद नाईक आणि बबलू पांगम यांनी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे (शिंदे गट ) जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या सहीने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी भगवान गवस, दादा देसाई, लाडू आयनोडकर,गुरु सावंत, राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, महिला तालुकाध्यक्ष चेतना गडेकर, सान्वी गवस आदी उपस्थित होते.