महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुटुंबीयांसह रांगेत राहून केले मतदान
कणकवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज कणकवलीतील मतदान केंद्रावर कुटुंबीयांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी समृद्धी पारकर, मुलगा सौरभ पारकर, मुलगी गांधर्वी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.





