आचरा सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांची तत्परता

हिर्ले वाडी येथील रस्त्यावर पडलेले झाड हटवून रस्ता केला मोकळा

आचरा हिर्लेवाडी येथील ब्राह्मण मंदिरासमोरील रस्त्यावर रविवारी पहाटे आंब्याचे झाड पडल्याने सकाळीच येणारया एसटी बस आणि खाजगी गाड्या अडकल्या होत्या. आंब्याच्या फांदी सोबत विद्यूत ताराही खाली आल्या होत्या. यामुळे धोका निर्माण झाला होता.
याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांना समजताच तातडीने सरपंच जेरान फर्नांडिस यांना सांगितली.त्यांनी ग्रामपंचायतचा कटर घेऊन हिर्लेवाडी येथे धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ पांडुरंग वायंगणकर, अश्विन हळदणकर, किशोर हिर्लेकर,तोंडवळकर यांच्या सहाय्याने रस्त्यावरील पडलेलेआंब्याचे झाड हटवून रस्ता मोकळा केला. तसेच विद्यूत मंडळालाही या बाबतची माहिती दिली होती. सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांच्या तत्परतेबद्धल वाहनचालक, हिर्लेवाडी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!