आंगणेवाडी भराडीदेवी मंदिरा पर्यंत जाणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून विशेष प्रयत्न

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची माहिती

कणकवली : कोकणचे आराध्य दैवत असलेल्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाला आहे. आंगणेवाडी ला जोडणारे नऊ रस्ते १८ कोटी रुपयांचे खर्च करून डांबरीकरण करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेचा प्रवास विनासायास आणि खड्डे मुक्त होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे रस्ते विकसित करण्यासाठी निधी दिला. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठक घेत आवश्यकत्या सूचना दिल्या होत्या. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा भराडी देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणारे हे रस्ते सुस्थितीत व्हावेत यासाठी मागणी केली होती. तर सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तत्परता दाखवत विकास कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून ही कामे पूर्ण केली आहेत.
आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेला लाखो भाविकांची गर्दी असते. या यात्रेत सर्व भाविकांना सहभागी होणे शक्य व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाने युद्धपातळीवर कामे पूर्ण केली आहेत.८३ किलोमीटरचे रस्ते ज्यात, काळसे कट्टा प्रमुख जिल्हा मार्ग, मालवण बेळणा रस्ता , गोळवन पोईप रस्ता, ओझर कांदळगाव,मागवणे, मसुरे बांधिवडे आडवली भटवाडी रस्ता, राठिवडे हिवाळे,ओवळीये,कसालल,रस्ता,ओसरगाव,रस्ता,चौके, धामापूर, रस्ता, कुमासे, नांदोस तिरवडे, सावरवाड रस्ता, चौके, आमडोस, मळगाव, मसुरे ,देऊळवाडी ,आंगणेवाडी रस्ता बिळवस आंगणेवाडी रस्ता असे ८३ किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण करून सुसज्ज करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त शौचालय महिलांसाठी व पुरुषांसाठी आणि प्रत्येक एसटी स्टँडवर दहा शौचालय स्त्रियांसाठी दहा शौचालय पुरुषांसाठी ठेवण्यात आली आहेत कायमस्वरूपी दोन कोटी रुपयांची शौचालय आंगणेवाडी येथे बांधली जाणार आहेत त्याला मान्यता मिळालेली आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्व गोड यांनी दिली.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!