भडगावात शिवसेनेने दाखविली एकजूट

जलजीवनच्या भूमीपूजनला आलेल्या निलेश राणेंना एका व्हाळावरच नारळ फोडून फिरावे लागले मागे
कुडाळ : कालच भडगाव खुर्द गावामध्ये निलेश राणे येणार व जलजीवन मिशन नळयोजना, ब्राम्हणवाडी रस्ता यांची भूमिपूजन करणार असल्याची जाहिरात गावातील राणे समर्थक मंडळींकडून करण्यात आली. वस्तुस्थिती अशी की जलजीवन मिशनची विहीर ही शिवसेनेच्या पाठपुराव्यातून तसेच आमदार वैभव नाईक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच ब्राम्हणवाडी रस्ता कामासाठी बजेटमधून आमदार वैभव नाईक यांनीच ९ लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. असे असताना खोटं बोलण्याच्या राणे समर्थकांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हे काम आम्ही मंजूर केले असे भासवत कामाच्या भूमीपूजनाचा घाट घालण्यात आला.
काहीही संबंध नसताना राणे या कामाचे भूमिपूजन करणार म्हटल्यावर गावातील शिवसैनिक एकवटले व मंदिरासमोर भूमिपूजन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. शेवटी शिवसैनिकांसमोर आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच राणेंना घेऊन आलेल्या गावातील ५ ते ६ कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी नळयोजनेचा काहीही संबंध नाही अशा एका व्हाळावर बॅनर लावून राणेंच्या हस्ते नारळ फोडून घेतला.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ