*स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा -अभिनेत्री ,अक्षता कांबळी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे दिनांक १०मार्च२०२३ रोजी सकाळी ११वाजता जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कामगार व कामगार कुटुंबीयआठ महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता ,या कार्यक्रम ला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री अक्षता कांबळी लाभल्या होत्या ,त्यांच बरोबर विशेष अतिथी माजी नगरसेविका नीलम पालव ,नगरसेविका कविता राणे,दीपा सरूडकर, दिव्या साळगावकर उपस्थित होत्या ,कार्यक्रम ची सुरुवातदीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली . उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले.कामगार कल्याण चे सर्वेसर्वा संतोष नार्वेकर हे नेहमीच तळागाळातील कार्यशील महिला शोधून त्यांच्या कार्याचा गौरव करतात म्हणून अक्षता कांबळी यांनी नार्वेकर यांचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या ,उपस्थित मान्यवर व सत्कारमुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रम ची सांगता केली .

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!