खारेपाटण महाविद्यालयात ‘महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा..

खारेपाटण: कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.
स्त्रियांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेउन प्रत्येकीने सक्षम झालं पाहिजे. आपली ओळख जपली पाहीजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे यांनी केले. .महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षामार्फत महिला दिनाचे आयोजन करण्यात आले, या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए. डी कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. रश्मी देसाई यांनी सामाजिक विकासातील महिलांचे महत्त्व सांगून,स्वतःची ओळख प्रत्येक स्त्रीने निर्माण केली पाहिजे असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्तम सहभाग नोंदविला. यामध्ये अदिती भालेकर,ऋता इतकरी,विशाखा जाधव,श्रुती पाटणकर,व पुजा पोटफोडे या विद्यार्थ्यांनीनी आपला सहभाग नोंदविला.तसेच महाविद्यालयातील प्रा.शारमिन काझी प्रा.डाँ.वंदना शिंदे,प्रा.माधवी पांचाळ या मॕडमनी देखील आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मंगल परब, प्रास्ताविक प्रा.समरीन काझी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.नमिरा मुजावर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.अशाप्रकारे खारेपाटण महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने महिलादिन साजरा करण्यात आला.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण