आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी हाती घेतली मशाल.
भाजपला मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के
राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- तृप्ती लंगोटे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक दोन माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह काल आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते कुंभारमाठमधील गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना तृप्ती लंगोटे म्हणाले की नारायण राणे हे स्वतः खासदार असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना विधानसभेत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राणे हे घराणेशाही करत असून सर्वसामान्य नेतृत्वाला पुढे येऊ देत नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत कुंभारमाठ गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,माजी नगरसेवक यतीन खोत,शहर प्रमुख बाबी जोगी,मनोज मोंडकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे , युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल परब,उपविभागप्रमुख अजित पार्टे,वायरी सरपंच भगवान लुडबे, शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली डिचवलकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.