उंबर्डेत ठाकरे गट शाखाप्रमुख रमेश साळवी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत

 कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उंबर्डेतील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये विशाखा सकपाळ, शशिकांत जाधव, जगन्नाथ जाधव, सतीश मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, संजय सावंत, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, अतुल सरवटे, किशोर दळवी, रोहन रावराणे, वैभवी दळवी, स्वप्नील खानविलकर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उंबर्डे गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांनी भरघोस निधी दिला आहे. यापुढे देखील गावचा विकास आमदार नितेश राणेच करू शकतात. असा विश्वास श्री. साळवी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!