आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कासार्डे गावचे ठाकरे गटाचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांचा भाजपात प्रवेश

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कासार्डे येथील ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी श्री. नितेश पिसे व विजय भोगले यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आश्वासित केले.
यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, संतोष पारकर, उपस्थित होते.