देवगड आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या त्रासाने कर्मचारी त्रस्त

विभागीय अध्यक्ष एसटी कष्टकरी जनसंघ अनंत प्रकाश रावले यांचा आरोप

देवगड आगारतील सहाय्यक वाहतूक निरक्षक श्री गोरे यांच्या त्रासा मुळे कर्मचारी त्रस्त असून विभागीय अधिकारी यांचे मात्र तक्रार करून दुर्लक्ष होत आहे अशी माहिती विभागीय अध्यक्ष एसटी कष्टकरी जनसंघ श्री अनंत प्रकाश रावले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
देवगड आगार मध्ये विनंती बदली करून आलेले सहाय्यक वाहतूक निरीक्षक हे आपल्या मनमानी पद्धतीने सर्व कर्मचारी विशेषतः चालक वर्गाला प्रचंड प्रमाणात त्रास देत आहेत. आगार व्यवस्थापक देवगड श्री घोलप त्याच प्रमाणे वाहतूक निरीक्षक व प्रभारी सहायक वाहतूक अधीक्षक श्री सैतावडेकर यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करून सुद्धा आगार पातळीवर निर्णय घेण्यात आले नाहीत. विविध संघटना यांनी सुद्धा तसे पत्र आगार व्यवस्थापक यांच्या कडे दिले तरीही यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. तसेच विभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.तसेही विभागीय कार्यालयाचे सुद्धा काम सध्या विभागीय वाहतूक अधीक्षक करत आहे. विभाग नियंत्रक नाहीत आणि बाकी सर्व अधिकारी रजेवर. या सर्वामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. यावर योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईलच. परंतु अपघात झाला किंवा काही चुकीचे घडले तर प्रशासन जबाबदार राहील असे विभागीय अध्यक्ष एसटी कष्टकरी जनसंघ श्री अनंत प्रकाश रावले यांनी सांगितले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!