वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा २०२४ जाहीर

शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर, रोजी अंतिम फेरी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशात कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विशेष असे स्थान आहे. गेली ४७ वर्षे नाटय, संगीत, साहित्य, सर्व ललितकलांचे वैशिष्टयपूर्ण उपक्रम संस्थेद्वारे आयोजित केले जातात. संगीत क्षेत्रातील त्रिसुत्री उपक्रम गेली २५ वर्षे अविरतपणे आयोजित केले जात आहेत. त्यात वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा, संगीत रसग्रहण कार्यशाळा व पंडीत जितेंद्र अभिषेकी स्मृति महोत्सव अशा कार्यक्रमाची घोषणा करतांना विशेष आनंद होत आहे. या उपक्रमाचे हे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा २०२४ ही प्राथमिक फेरी व अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. या स्पर्धेत शास्त्रीय संगीताचा किमान ५ वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या स्पर्धकाला या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकाने संस्थेच्या गुगल लिंक htps://forms.gle/forwbu3AAW5K9ComB या लिंकद्वारे प्रवेश घेता येईल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ अशी आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संस्थेच्या https://www.acharekarpratishthan.org या संकेत स्थळावर माहिती उपलब्ध आहे. प्राथमिक फेरीसाठी प्राप्त होणाऱ्या स्पर्धकांची शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी अंतिम फेरी गायनास संधी मिळणार आहे. संगीत क्षेत्रातील नामवंत परीक्षक उत्तम साथ संगीत करणारे वादक, पारदर्शी परिक्षण ही या स्पेर्धेची वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्र.१०,०००/- द्वितीय क्रमांक ७,०००/-
व तृत्रिय क्रमांक ५,०००/- अशी रोख पारितोषिके व स्मृति चिन्हे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला पंडी जितेंद्र अभिषेकी स्मृति संगीत महोत्सवात आपले गायन सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धेच्या अटी व नियम बंधनकारक राहाणार आहेत. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गाने या स्पर्धेत सहभागी व्हावे व अधिक माहितीकरिता संस्थेच्या सहकार्यवाह श्रीमती सीमा कोरगांवकर (मोबा. ९४२२३८१९७५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड.एन. आर.देसाई यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!