एलसीबी कडून अवैध गोवा बनवटीच्या दारूवर दुसरी मोठी कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 लाख 16 हजाराची दारू जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 निर्भय व न्यायीक वातावरणात तसेच शांततेत पार पाडावी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता अवैध दारु वाहतुक, विक्री करणारे यांचेविषयी माहिती संकलीत करुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याक्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळी विशेष पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.18.10.2024 रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांना गोवा बनावटीची दारु भरुन स्विफ्ट कारने वाहतुक होणार असुन सदरची वाहतुक ही वजराट वेंगुर्ला रोडने वेंगुर्लाच्या दिशेने येत असलेबाबत खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाली होती. त्यादृष्टीने कारवाई करणेकरीता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विशेष पथक वजराट तिठा येथे थांबून टेहळणी करीत असताना दि.19.10.2024 रोजी 00:15 वाजताचे दरम्याने वजराट तिठा येथे स्विफ्ट कार क्र. MH-02- DS-5607 सशंयीत रित्या येत असल्याचे आढळुन आली. म्हणून सदरची कार थांबवून कारची खात्री केली असता कारमध्ये दोन इसम स्वतःचे ताब्यातील स्विफ्ट कार क्र. MH-02-DS-5607 मध्ये 2,16,000/- रुपये (दोन लाख सोळा हजार रुपये) किंमतीची गोवा बनावटीची दारु व वाहतुक करुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याने मिळुन आले. म्हणुन त्या दोन्ही इसमांविरुध्द वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 128/2024, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ), (ई), 81, 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाची स्विफ्ट कारची किंमत 3,00,000/- रुपये असुन 2,16,000/- रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा एकुण 5,16,000/- रुपये (पाच लाख सोळा हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व श्री. कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनानुसार तसेच श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नेमणुक करण्यात आलेले विशेष पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, बस्त्याव डिसोझा व पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर यांनी केलेली आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





