सावंत फौंडेशन आयोजित कै. श्री महादेव सीताराम सावंत (अप्पा डोंगरे) यांच्या 27 व्या पुण्यस्मरण वर्षानिमित्त स्मरणार्थ वर्ष 3 रे मूर्ती स्पर्धेचे आयोजन कळसुली इंग्लिश स्कुल कळसुली, शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव, आणि माध्यमिक विद्यालय नाटळ येथे करण्यात आले

भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल.सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि मूर्तीकला यांचा समावेश होतो सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती,मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो.मुद्रिकावर बैल,गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात.

आणि ही कला परंपरेने आज तागायत जिवंत ठेवण्याचे काम मूर्तिकार कलाप्रेमी करत आहेत . याचीच ओढ पुढील पिढीला लागावी, यासाठी मूर्ती स्पर्धा घेऊन हा वारसा पुढील पिढीत रुजवा हा एक छोटासा प्रयत्न सावंत फौंडेशन जोपासत आहे .मूर्ती स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. अगदी आमच्याही बाल अवस्थेत आम्ही मातीचे बैल, गाय, गायवासरू, गणपती, पूजेसाठी लागणारा कृष्ण ,नागोबा बनवत असू आणित् याचा आनंद घेत असू आता सर्व काही बाजारात उपलब्द्ध झालं आणि मातीचा आणि मुलांचा संपर्क तुटला. कै. अप्पा डोंगरे हे मूर्तिकार होते गणपतीच्या दिवसात घरी सुंदर गणपती बनवत असत. आणि 6 फेब्रुवारी 2023 ला त्यांना 25 वर्षे पूर्ण होत झाली. म्हणून हे संपूर्ण वर्ष विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली या संकल्पनेतून मूर्ती स्पर्धा भरवून दर वर्षी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही स्पर्धा तशीच पुढे चालु ठेवण्यात आली या तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.यासाठीचे नियम अटी अगदी साधेच आहेत गणेश मूर्ती 6 इंच ते 9 इंच आकाराची असावी रंगकाम आवश्यक नाही नुसते डोळे आणि काही दागदागिने रंगवलेले असावेत. याला कळसुली हायस्कुल आणि शिवडाव हायस्कुल आणि माध्यमिक हायस्कुल नाटल या तिन्ही शाळांन मधून सुंदर प्रतिसाद मिळाला या स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवार दिनांक १०ऑक्टोम्बर सारस्वतीपूजनाच्या वेळी तिन्ही शाळांमध्ये करण्यात प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹१००१,₹७५१/- व ₹५०१/- व उत्तेजनार्थ तिघांना प्रत्येकी ₹१०१/- अशी पारितोषिके देण्यात आली.आला.स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१) कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली
या स्पर्धेमध्ये लहान गटातून
१)कु. सिद्धेश नंदन गावकर (इयत्ता ५वी) – प्रथम,
२)कु. सौम्या सतिश सावंत (इयत्ता ५वी) – द्वितीय,
३)कु. सोमिल पंढरी देसाई (इयत्ता ६वी) – तृतीय
उत्तेजनार्थ ध्रुवी विष्णू देसाई,सर्वेश शिवराम गावकर, धीरज शंकर गावकर मोठ्या गटातून
१)कु. करण संतोष तेली(इ. ८वी ) – प्रथम ,
२)कु. गिरीश मंगेश परब(इ.९ वी)- द्वितीय ३)कु.दत्तराज महादेव राऊत(इ.११वी)-तृतीय
उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकामध्ये मयुरेश मोती वरक, ऋतुराज शिवराम गावकर, मनाली अरुण घाडीगांवकर यांनी बक्षिसे पटकावली.
प्रशालेमध्ये गुरुवार दि. १० ऑक्टोबर, २०२४ रोजी शारदोत्सवानिमित्त या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सूर्यकांत दळवी (कार्याध्यक्ष- कळसुली शिक्षण संघ, मुंबई), श्री. के. आर. दळवी (स्कूल कमिटी- चेअरमन), श्री. नामदेव घाडीगावकर (स्कूल कमिटी – व्हाईस चेअरमन ), श्री. रजनीकांत सावंत (स्कूल कमिटी – सदस्य), सौ. शुभदा देसाई (स्कूल कमिटी – सदस्य), मुख्याध्यापक – श्री. वगरे व्ही.व्ही, श्री. शिवाजी गुरव (अध्यक्ष – शाळाव्यवस्थापन समिती), श्री. नीलकंठ माधव मुंडले (शाळा व्यवस्थापन समिती – शिक्षणतज्ञ) श्री. चंद्रसेन गोसावी (माजी वरिष्ठ लिपिक), श्री. मंगेश घाडीगावकर (शाळा व्यवस्थापन समिती – सदस्य), श्री राजाराम चव्हाण, श्री.भाई गावकर (पोलीस पाटील), सौ.श्वेता दळवी, श्री. प्रभाकर दळवी, शिक्षक पालक संघ पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन संघ पदाधिकारी त्याचप्रमाणे पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मूर्तीकला स्पर्धेचे परीक्षण प्रशालेचे शिक्षक श्री. अमर पवार व श्री. सचिन आर्लेकर यांनी केले.
२)शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव
प्राथमिक गट
१)प्रथम क्रमांक (रु.१००१): कु.मिथुन सोनू गांवकर (इ.७ वी)
२) द्वितीय क्रमांक (रु.७५१):कु.मंदार मधुकर परब (इ.७ वी)
३) तृतीय क्रमांक (रु.५०१):कु.दुर्वेश विजय ठाकूर ( इ.७ वी)
४) उत्तेजनार्थ प्रथम (रु.१०१):श्रीतेज दिपक गांवकर (इ.५ वी)
५) उत्तेजनार्थ द्वितीय (रु.१०१): कुमारी.निधी रवींद्र परब (इ.७ वी)
६) उत्तेजनार्थ तृतीय (रु.१०१):कु.श्रेयस शरद जाधव (इ.६ वी)
माध्यमिक गट
१) प्रथम क्रमांक (रु.१००१):कु.आदित्य दीपक कोरगावकर (इ.८ वी)
२) द्वितीय क्रमांक (रु.७५१):कु.संकेत मिलिंद गांवकर (इ.८ वी)
३)तृतीय क्रमांक (रु.५०१): कु.राजाराम अरुण गांवकर (इ.८ वी)
४)उत्तेजनार्थ प्रथम (रु.१०१): कुमारी धनश्री गजानन शिरवडेकर (इ.८ वी)
५)उत्तेजनार्थ द्वितीय (रु.१०१):कु. अनिरुद्ध विश्राम केणी (इ.८ वी)
६)उत्तेजनार्थ तृतीय (रु.१०१)पराग विक्रांत ठाकूर (इ.८ वी)
ही सर्व रोख बक्षिसे सावंत फाउंडेशन कळसुली यांनी प्रायोजित केलेली आहेत.सावंत फाउंडेशनचे प्रमुख श्री.शरद सावंत यांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.या बक्षीस वितरणास शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीम.भाग्यरेखा दळवी, खजिनदार श्री.विद्याधर गांवकर,सदस्य श्री. गणेश म्हसकर, मुख्याध्यापक श्री.मुकेश पवार आणि शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री .श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष श्री.मोहन पाताडे, कार्यवाह श्री. काशिराम गावकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
३) माध्यमिक विद्यालय नाटळ
या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून
१)प्रथम क्रमांक कुमारी.गार्गी संतोष सावंत या विद्यार्थिनीने मिळवला व 1001 रुपयाचे पारितोषिक मिळावले.
२)द्वितीय क्रमांक समीर संतोष झोरे यांने मिळवला व 751 रुपयाचे पारितोषिक मिळावले.
३)कुमारी.स्वरा कृष्णा पांचाळ हिने तृतीय क्रमांक मिळवत 501 रुपयाचे पारितोषिक मिळावले .
४)कुमार. कौस्तुभ प्रशांत पांचाळ यांने उत्तेजनार्थ 303 रुपयाचे पारितोषिक मिळवले.
माध्यमिक गटातून
१)कुमारी .वेदिका रमेश खांडेकर हिने प्रथम क्रमांक मिळवत 1001 रुपयाचे पारितोषिक मिळवले.
२)कुमारी.वैष्णवी मिलिंद डोंगरे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवत 751 रुपयाचे पारितोषिक मिळवले .
३)कुमार. सुजल प्रकाश भोगटे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवत 501 रुपयाचे पारितोषिक मिळवले.
४)कुमार. वेदांत वासुदेव सुतार या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ 303 रुपयाचे पारितोषिक मिळवले.
अशी पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सावंत फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले व आभार मानण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. दयानंद गावकर यांनी केले. प्रशालेतील या स्तुत्य उपक्रमाबद्दल राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ संस्था अध्यक्ष श्री.भालचंद्र सावंत शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत शालेय सदस्य पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केलं आहे.
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार आमच्या संस्थे तर्फे आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पांडुरंग सावंत यांनी मानले आहेत भविष्यात अशी स्पर्धा पंचक्रोशीतील शाळांमध्ये घेण्याचा माणस आहे

सावंत फौंडेशन
सेक्रेटरी
शरद सावंत

Leave a Reply

error: Content is protected !!