जि.प. केंद्रशाळा चिंदर नं. 1 चे मुख्याध्यापक मा.श्री. पंढरीनाथ करवडकर यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा

चिंदर नं १ चे मुख्याध्यापक पंढरीनाथ करवडकर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शाळा व्यवस्थापन समिती चिंदर व आजी माजी विद्यार्थी ,शिक्षक यांचे वतीने शारदोत्सवाचे औचित्य साधत सेवानिवृत्तीपर हृद्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित दत्तदास, चिंदर गावठण उन्नती मंडळ अध्यक्ष .अरुण घाडी, चिंदर पोलीस पाटिल दिनेश पाताडे, करवडकर सरांचे माजी विद्यार्थी पोंभुर्ले, तादेवगड गावाचे उपसरपंच सादिक डोंगरकर, पोंभुर्ले शाळेतील माजी विद्यार्थी दत्ताराम बावकर,
शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा .सौ.चिन्मयी पाताडे, चिंदर ग्राम पंचायत सदस्या सौ.जान्हवी घाडी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या तथा अंगणवाडी सेविका सौ. निकिता घाडी मुख्याध्यापक .राजेंद्रप्रसाद गाड,बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रथमतः सरांच्या हस्ते सपत्नीक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
संपूर्ण सेवाकालामध्ये सरांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणारे सन्मानपत्र, शाल श्रीफळ देत सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या वेळी बोलताना त्यांचे माजी विद्यार्थी तथा उपसरपंच डोंगरकर यांनी सरांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारामुळेच आज आपण राजकारणात सचोटीने काम करत असून त्यांचे संस्कार शेवटपर्यंत जपेन असे सांगत त्यांचे आभार मानले.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सरानी आज पर्यंतच्या वाटचालीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले.शाळेची गरज ओळखून शाळेलाही भेटवस्तू दिल्या.
याच वेळी शाळेतून बदलीने रामगड नं १ या शाळेत गेलेल्या प्रवीण तेली सरांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन तवटे सर यांनी केले तर आभार नंदकुमार जुंधळे सर यांनी मानले.