सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग तळेरे पर्यटनाच्या राजमार्गाच्या कामाचा आज शुभारंभ

कासार्डे तिठा येथे होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न
कार्यकारीद अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा विशेष पाठपुरावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग तळेरे रस्ता राज्यमार्ग 177 विजयदुर्ग, वाघोटन, पडेल, तरळे 52/ 455 या बहुप्रतिक्षित व पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची सुधारणा करणे या कामाचा ऑनलाईन शुभारंभ आज 11 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. पर्यटन दृष्ट्या हामार्ग महत्त्वपूर्ण असून, विजयदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या हजारो नागरिकांना जास्त फायदा होणार आहे. पर्यटनाचा हब म्हणून विजयदुर्ग किल्ला समोर आलेला असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला आहे. हा रस्ता कणकवली मतदारसंघात येत असल्याने याकरिता खास करून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केला व त्याला अखेर यश आले. या कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी हे काम मंजुरी मिळण्याकरता सातत्याने पाठपुरावा करत आमदार नितेश राणे व रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून कागदोपत्री प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली. त्याचा परिपाक म्हणूनच पुढल्या वर्षी च्या आत या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर या उपस्थित राहणार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकाम ) संजय दशपुते, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य अभियंता शरद राजभोज हे उपस्थित राहणार आहेत. कासार्डे तिठा येथे मुंबई गोवा महामार्गावर ऑनलाईन शुभारंभाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य अभियंता मिलिंद कुलकर्णी, कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता श्रीनिवास बातूस्कर, कनिष्ठ अभियंता श्रीनिवास नवपुते यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवलीं
