ऍड. संग्राम देसाई यांचा कुडाळ मध्ये होणार भव्य सत्कार

अधिवक्ता परिषदेच्या वतीने आयोजन

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. संग्राम देसाई यांचा 14 ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार करण्यात येणार आहे. अधिवक्ता परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी हा सोहळा होणार आहे. यावेळी माजी अध्यक्ष पारिजात पांडे, डेप्युटी सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन ऍड. सूर्यकांत खानोलकर जिल्हाध्यक्ष अधिवक्ता परिषद यांच्या सह जिल्ह्यातील वकील संघटने कडून करण्यात आले आहे..

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!