शुक्रवारी कनेडीमध्ये रंगणार खेळ पैठणीचा

आम. नितेशजी राणे यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन
कॉमेडी क्वीन, महाराष्ट्र हास्य जत्रा फेम वनिता खरात,विशाखा सुभेदार यांची उपस्थिती
सदानंदवाडी सांगवे यांच्यावतीने समाधी पुरुष हॉल, कनेडी येथे नवरात्रौत्सवानिमित्ताने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ११ अॉक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ६:०० वा संपन्न होणार असून यावेळी प्रसिद्ध कॉमेडी क्वीन,महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिता खरात आणि विशाखा सुभेदार या उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपस्थितांसाठी वनिता खरात आणि विशाखा सुभेदार या कॉमेडी स्कीट सादर करणार आहेत…
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते माजी जि. प. अध्यक्ष -संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि माजी जि. प. अध्यक्षा -संजना संदेश सावंत सिंधुदुर्ग यांनी केले आहे…
अस्मिता गिडाळे, खारेपाटण




