वैशाली गावकर ठरल्या एलआयसीच्या मालवण ब्रांच मधील पहिल्या शतकवीर

अवघ्या सहा महिन्यात ठरल्या शतकवीर
मालवण (प्रतिनिधी) एलआयसी ऑफ इंडियाच्या मालवण शाखेत २०२३- २४ या वर्षात सर्वात पहिलं शतक झळकावण्याचा मान मालवणच्या वैशाली विकास गावकर यांना मिळाला आहे त्यांचे मालवणच्या ब्रांच मॅनेजर सतेजा बोवलेकर यांनी अभिनंदन केल आहे.
वैशाली गावकर या मालवण ब्रांच मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून गेली 21 वर्षे काम करत आहेत. त्यांनी गेल्या 21 वर्षात एलआयसी शाखेमध्ये विविध सन्मान मिळवले आहेत. एलआयसीचा वन डे वंडर हा किताबही त्यांनी मिळवला आहे. 2023- 24 या आर्थिक वर्षात वैशाली गावकर यांनी शंभर पॉलिसी 25 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण करून त्यांनी पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी सध्या 121 नवे विमा प्रस्ताव एलआयसी ब्रांच मध्ये सादर केले आहेत. खर तर शतकवीर हा एलआयसीतील मोठा सन्मान मानला जातो.एक वर्षात शतक बनवणं हा प्रत्येक विमा प्रतिनिधींचा प्रयत्न असतो. वैशाली गावकर यांनी मात्र अवघ्या 6 महिन्यात शतक बनवल आहे. या वर्षात द्विशतकवीर होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आगामी काळात एलआयसीच्या नव-नवीन योजना येणार आहेत. यासाठी आपण प्रस्ताव सादर करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शंभर प्रस्ताव सादर करण्यासाठी मालवणचे ब्रांच मॅनेजर सतेजा बोवलेकर, एलआयसी टीम मालवण,तसेच विमाधारक यांचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं आहे त्यांच्या सहकार्यामुळेच एवढा पल्ला गाठू शकले अशी प्रतिक्रिया वैशाली गावकर यांनी व्यक्त केली आहे.




