नरडवे घोलणवाडी मध्ये विकासकामे प्रलंबित ठेवणार नाही!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे प्रतिपादन

नरडवे घोलणवाडी मध्ये बैठक

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नरडवे गावात घोलणवाडी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी सुशांत नाईक यांनी घोलणवाडी येथील ग्रामस्थांशी विकास कामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी अनेक वर्षे होत नसलेली कामे व सोयी सुविधा या बाबत सुशांत नाईक यांच्याशी चर्चा केली. युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांनी देखील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व अनेक वर्षे रखडलेल्या विकास कामांवर लवकरच आपण उपाययोजना करू अशी चर्चा करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक सोबत युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, आनंद सावंत सर, तुषार गांवकर, हनुमंत घोणे, प्रकाश सावंत, प्रकाश परब, संतोष परब, निलेश देसाई मधुकर परब, विजय निकम, सुरेश घोणे, लवू निकम,धाकू गावडे, प्रकाश गावडे, वसंत कदम, किशोर जाधव, जयंत घोणे, सुभाष साटम, पांडुरंग निकम, महेश परब, सुभाष परब, विलास सावंत, बबन जाधव, उमेश कदम, शंकर परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!