आचरा पोलीस पाटील सुनील खरात यांचा सत्कार


नवनियुक्त पोलीस आचरा पोलीस पाटील सुनील खरात यांचा सत्कार सन्मान


आचरा–अर्जुन बापर्डेकर
पोलिस पाटील भरती प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील उमेदवारांना संघटित करत सर्वांना सोबत घेऊन योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल नवनियुक्त पोलिस पाटील यांच्यावतीने आचरा वरचीवाडी पोलिस पाटील सुनील खरात याना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा मालवण कुंभारमाठ येथील अथर्व मंगल कार्यालयात पार पडला.

*जिल्ह्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया बराच काळ रेंगाळली होती. अशावेळी जिल्ह्यातील या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना सकारात्मक दृष्टीने एकत्र करण्याचे काम त्यांनी केले. शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर समन्वय साधत उमेदवारांची बाजू लावून धरली.

या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना सतीश माडये, वैभव धुरी, राजन राणे, दशरथ गोवेकर, हेमंत परब, समीर परब, संग्राम कासले, समीक्षा सुकळी, दीपक घाडी, सरोज काजरेकर, श्रावणी सावंत, विद्याली परब, श्वेता मेस्त्री, विदिती सावंत यांसह सर्वच उमेदवारांची खंबीर साथ मिळाली.

error: Content is protected !!