राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत श्री परशुराम गुरव असगनी नंबर १ राज्यात द्वितीय….

आचरा–अर्जुन बापर्डेकर
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन दर्जेदार ई साहित्य निर्माण व्हावे व विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुलभ भावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती त्यासाठी विविध विषय देण्यात आले होते.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगणी नंबर १ शाळेचे पदवीधर शिक्षक श्री परशुराम सीताराम गुरव यांनी गणिताचे अध्यापन प्रभावीपणे करण्यासाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती केली होती… राज्यस्तरीय स्पर्धेत या व्हिडिओला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यासाठी ४० हजार रुपयाचे बक्षिस जाहीर झाले आहे… शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव केला जात आहे…. यापूर्वीही त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
राज्यस्तरीय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम रविवार दिनांक २९ एप्रिल रोजी पुणे येथे होणार… श्री गुरव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे….