जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी प्रथम

आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवानिमित्त आचरा देवूळवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक भैरव जोगेश्वरी संघ कुडाळ यांनी मिळविला. तृतीय क्रमांक स्वयंभू फुगडी मंडळ कणकवली बांधकरवाडी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पाटेकर संघ पणदूर, सखी गृप खारेपाटण,ब्राम्हण देव फुगडी संघ तेरई यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सौ अर्चना बागवे,सौ प्रियांका सकपाळ यांनी केले. स्पर्धेचे बक्षिस वितरण देवस्थान मानकरी योगेश मिराशी, देवूळवाडी मित्र मंडळाचे रविंद्र गुरव,मंदार सांबारी, अर्जुन बापर्डेकर, नंदकिशोर सावंत, सदानंद घाडी, परेश सावंत,उदय घाडी,नितीन घाडी, रमेश पुजारे,रामचंद्र घाडी, राजू घाडी, राजन मेस्त्री, देवस्थान ट्रस्टी मंगेश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, प्रविण मेस्त्री ,चंद्रकांत घाडी, मंगेश मोहन मेस्त्री आदींच्या उपस्थित करण्यात आले. स्पर्धेचे सुत्रसंचलन वर्षा सांबारी, भावना मुणगेकर यांनी केले.