कणकवली शहरातील हायवेच्या स्ट्रीट लाईट बंद

गेले काही महिने महामार्ग प्राधिकरणचे होतेय दुर्लक्ष
स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्याची होते मागणी
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत लावलेल्या स्ट्रीट लाईट अनेकदा बंद असून देखील त्याची महामार्ग प्राधिकरण कडून कोणतीही दखल घेतली जात नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असताना देखील एसएम हायस्कूल पासून ते अगदी गडनदी पुला पर्यत अनेक ठिकाणच्या स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सुरू असलेल्या लाईटचा अपवाद वगळला तर इतर ठिकाणच्या बंद असलेल्या लाईट कडे महामार्ग प्राधिकार्यांचे होत असलेले डोळेझाक ही नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. तसेच या स्ट्रीट लाईट सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही हालचाल नसल्याने एखाद्या गोष्टीवर आंदोलन केल्यावरच महामार्ग प्राधिकरण ला जाग येते का? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. पादचारी, वाहनचालक, सायंकाळच्या तसेच सकाळच्या सत्रात वॉकिंगला जाणाऱ्या नागरिकांना पुलावर असलेल्या लाईट किंवा पुलाखालील बंद लाईट वॉकिंग च्या वेळी उपयोगी ठरतात. मात्र गेले काही दिवस या लाईट बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली