राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे वि.स.खांडेकर हायस्कुल सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
सावंतवाडी : राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वि.स.खांडेकर महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पधेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी माजी नगरसेवीका राजगुरु मॅडम तसेच संघटनेचे कुडाळ तालुका उपाध्यक्षा सौ..रांगणेकर मॅडम, सावंतवाडी शहर अध्यक्षा सौ . संचिता गावडे व सौ पारधी मॅडम यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी सर्व महिला मान्यवर व पदाधीकारी यांनी महीला दिनानिमीत्त मनोगत व्यक्ती केले.शालेय विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्यांचे सादरीकरण करून स्पर्धेत सहभाग दर्शवीला.
प्रथम क्रमाक कु. अक्षदा आमित सांळुखे द्वीतीय कु. रविनी पुंडलिक भिसे व तृतीय क्रमाक कु. स्वानंदी दशरथ गावकर यांचा आला. या कार्यक्रमवेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाराम पवार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष तळवणेकर, सचिव कल्याण कदम, संपर्कप्रमुख श्री शिवा गावडे ,शाळेचे शिक्षक कोळी सर, धुमाळे, घोगरे मॅडम, शृंगारे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.डी. शृगारे तर आभार धुमाळे मानले. त्यावेळी शाळेचे विद्यार्थी सह पालक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
सावंतवाडी / प्रतिनिधि