मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची बाजी.

कणकवली/मयूर ठाकूर

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेने सलग दुसऱ्या वर्षी तालुका स्तरावर माध्यमिक गटात (खाजगी व्यवस्थापन) शाळांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
दहावी, बारावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा,याशिवाय ऑलिम्पियाड, एम. टी. एस.शिष्यवृत्ती परीक्षा,ब्रेन डेव्हलपमेंट,अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची चमक,तसेच वकृत्व,निबंध,प्रश्न मंजुषा स्पर्धा,अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.विविध क्रीडा प्रकारात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर झेप घेतली आहे.
सुसज्ज शाळा परिसर,तज्ञ शिक्षक वर्ग,प्रभावी व्यवस्थापन,अशा सगळ्याच गोष्टीत अग्रेसर असणाऱ्या या शाळेने हा बहुमान प्राप्त केला आहे .
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षणं संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरीभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई , प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!