आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच कार्यालय फोडल

राजकोट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक संतप्त

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार वैभव नाईक यांनी या घटनेला जबाबदार धरत मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यालय स्वतः हातात दांडा घेऊन फोडलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दरवाज्याची काच व कार्यालयीन टेबल वरील काच व साहित्य फोडून आमदार वैभव नाईक यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामामुळे ही घटना घडल्याने या घटनेचा संताप अशा प्रकारे व्यक्त केला.

दिगंबर वालावलकर /मालवण

error: Content is protected !!