सुरांच्या वर्षावात रसिक झाले चिंब….आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये “श्रावणधारा”उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे आणि डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रावणधारा 2024 ही जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद लाभलेले ही स्पर्धा तीन गटात संपन्न झाली.या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा ‘श्रावणधारा ‘2024 या स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे
गट पहिला -5 वी ते 8 वी
प्रथम क्रमांक –
तनुश्री निलेश मराठे.
द्वितीय क्रमांक –
प्रांजली महेश कानेटकर.
तृतीय क्रमांक –
अवनी बाळकृष्ण नाईक.
उत्तेनार्थ प्रथम क्रमांक –
ध्रुव विजकुमार गोसावी.
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक –
मैत्री मंदार कुंटे.
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक –
आरोही मनोज मेस्त्री.
गट दुसरा -9 वी ते 12 वी
प्रथम क्रमांक
कुणाल कृष्णा परब.
द्वितीय क्रमांक
आर्या गणेश घाडी.
तृतीय क्रमांक
श्रुती शरद सावंत.
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक –
आयुष श्रीरंग भिडे.
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक –
खुशी विशाल आमडोस्कर.
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक-
प्राजक्ता अभयकुमार ठाकूरदेसाई.
गट तिसरा – खुला गट
प्रथम क्रमांक –
पूर्वा निलेश धाकोरकर.
द्वितीय क्रमांक –
कौस्तुभ संतोष धुरी.
तृतीय क्रमांक –
सानिका लक्ष्मीकांत सासोलकर.
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक –
ऋचा शंकर कशाळीकर.
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक –
सानिका संजय गावडे.
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक –
हर्षदा संदीप सामंत.
विशेष उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक –
डॉ. संपदा विवेक रेवडेकर.
विशेष उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक
सौ नेहा दीक्षांत देशपांडे.

या कार्यक्रम प्रसंगी हरकूळ बुद्रुक चे ग्रामविकास अधिकारी श्री. संजय कवठकर सर यांची विस्तार अधिकारी पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेचे परीक्षण माधव गावकर व ज्ञानदेव येंडे सर यांनी केले.या कार्यक्रमाला ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,श्री. यज्ञेश शिर्के सर,सौ.गौसिया बुलंद पटेल मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,तसेच डॉ राजअहमद हुसेंनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन श्री.गणेश घाडीगांवकर सचिव श्री.रमाकांत तेली हरकुळ बुद्रुक पोलीस पाटील श्री.संतोष तांबे तसेच संगीत कलेतील अनेक मान्यवर तसेच आयडियल इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच डॉ राजअहमद हूसेंनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी हार्मोनियम साथ श्री.महेश तळगावकर यांनी केली,तबला साथ श्री.अभिषेक सुतार यांनी केली ,साऊंड व्यवस्था राजेश गुरव यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पाटकर सर यांनी केले तर आभार ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सल्लागार श्री.डी. पी. तानवडे सर व संस्थेचे सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर यांनी मानले.

error: Content is protected !!